Google search engine
Home आपला विदर्भ वट्रा येथील श्रुती आत्रामच्या उपचारासाठी राजे अम्बिशराव आत्राम यांची तत्पर मदत

वट्रा येथील श्रुती आत्रामच्या उपचारासाठी राजे अम्बिशराव आत्राम यांची तत्पर मदत

अहेरी, प्रतिनिधी :                                                                                                        अहेरी तालुक्यातील वट्रा येथील कु. श्रुती महेश आत्राम (वय १४) हिला गंभीर आजार झाल्याने ठाणे येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. ही माहिती मिळताच माजी राज्यमंत्री राजे अम्बिशराव आत्राम यांनी तत्काळ आर्थिक मदत करून आत्राम कुटुंबाला दिलासा दिला.

               यावेळी राजे अम्बिशराव आत्राम यांनी श्रुतीची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी, ती लवकरात लवकर पूर्णपणे बरी होऊन आपल्या कुटुंबात सुखरूप परतावी, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच कुटुंबीयांना धीर देत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही दिली.

           श्रुतीचे वडील महेश आत्राम हे भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख असून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. तसेच परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठीही ते नेहमी पुढाकार घेत असल्याचे सांगितले जाते.

               संकटकाळात माजी राज्यमंत्री राजे अम्बिशराव आत्राम यांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीबद्दल आत्राम कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

nagvidarbhavartae