Google search engine
Home आपला विदर्भ सिरोंचा–आलापल्ली मार्गावर जड वाहनांना ‘ब्रेक’

सिरोंचा–आलापल्ली मार्गावर जड वाहनांना ‘ब्रेक’

महामार्ग बांधकाम व पावसाळी धोका; ३१ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीवर बंदी, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे निर्देश

गडचिरोली, दि. ७ (प्रतिनिधी) :-

            राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वरील सिरोंचा–आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे तसेच पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ७ जुलै २०२६ च्या मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

                जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. महामार्गावरील बांधकाम सुरळीत पार पडावे आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

        मात्र, आपत्कालीन सेवा, प्रवासी बस, पोलीस, पाणीपुरवठा, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार, आरोग्य विभाग तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

              जड वाहनचालकांनी सिरोंचा–मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली तसेच आलापल्ली–आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.

■ महत्त्वाचे मुद्दे

  • बंदीचा कालावधी : ७ जुलै (मध्यरात्र) ते ३१ ऑक्टोबर २०२६
  • बंदी लागू : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी, सिरोंचा–आलापल्ली मार्ग
  • कोणत्या वाहनांना बंदी? सर्व प्रकारची जड वाहने
  • सूट : आपत्कालीन सेवा, प्रवासी बस, पोलीस, पाणीपुरवठा, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार, आरोग्य विभाग व रस्ते दुरुस्तीची वाहने
  • पर्यायी मार्ग :
    • सिरोंचा–मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली
    • आलापल्ली–आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल
  • उल्लंघन केल्यास : प्रचलित कायद्यानुसार कारवाई
nagvidarbhavartae