Google search engine
Home आपला विदर्भ मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम मुद्दतवाढ जाहीर: अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी...

मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम मुद्दतवाढ जाहीर: अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ यांचे आवाहन

अहेरी/पंकज नौनुरवार:-
             महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. कोकण, मुंबई व काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या व्यत्ययामुळे भारत निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे.
            याबाबत माहिती देताना उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया नवीन सुधारित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटनांना या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सुधारित पुनरीक्षण कार्यक्रम:
१. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी: ३०.०६.२०२६ ते ०८.०८.२०२६
२. मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण/ पुनर्रचना: ०८.०८.२०२६ पर्यंत
३. मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी: १७.०८.२०२६ (सोमवार)
४. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी: १७.०८.२०२६ ते १६.०९.२०२६
५. नोटीस कालावधी/ दावे व हरकती निकाल काढणे: १७.०८.२०२६ ते १५.१०.२०२६
६. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: १९.१०.२०२६ (सोमवार)
                        अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांनी या कालावधीत आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी आणि BLO यांना मुद्दतीपूर्व सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

nagvidarbhavartae