Google search engine
Home आपला विदर्भ अधिकारी वैभव पांढरे प्राणघाती हल्ला प्रकरण: आणखी ३ आरोपी पोलिसांना शरण; आज...

अधिकारी वैभव पांढरे प्राणघाती हल्ला प्रकरण: आणखी ३ आरोपी पोलिसांना शरण; आज चामोर्शी न्यायालयात होणार हजर!

गडचिरोली/अहेरी:
अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघाती हल्ला प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली आहे. घटनेनंतर फरार असलेल्या अन्य तीन मुख्य आरोपींनी अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, पोलीस आज या तिघांनाही चामोर्शी न्यायालयात हजर करणार आहेत.

आरोपी कोण?
अजय दादाराव नैताम,श्रीनिवास उर्फ पिंटू लक्ष्मण मडावी,इमरान मुस्तफा पठाण असे आहेत शरण आलेले आरोपी.

•काय आहे प्रकरण?
अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. या गंभीर गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. अटकेच्या भीतीने आणि पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे अखेर या तीनही आरोपींना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागले.

आज न्यायालयात होणार हजर, पोलीस कोठडीची शक्यता:
शरण आलेल्या अजय नैताम, श्रीनिवास मडावी आणि इमरान पठाण या तिघांनाही पोलीस आज (सोमवार) चामोर्शी न्यायालयात हजर करणार आहेत. या प्राणघाती हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण? हल्ला करण्यामागचा नेमका हेतू काय होता? आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस या आरोपींची पोलीस कोठडी (पीसीआर) मागण्याची दाट शक्यता आहे.
या प्रकरणातील आरोपी न्यायालयासमोर हजर होणार असल्याने चामोर्शी न्यायालय यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

nagvidarbhavartae