Google search engine
Home गडचिरोली गडचिरोली पोलिस दलात मोठे फेरबदल; १० नवे उपअधीक्षक दाखल, ७ जण जिल्ह्याबाहेर

गडचिरोली पोलिस दलात मोठे फेरबदल; १० नवे उपअधीक्षक दाखल, ७ जण जिल्ह्याबाहेर

§नागविदर्भ वार्ता
गडचिरोली:~
राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलिस उपअधीक्षक (DySP) तथा सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जवळपास सर्वच उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांपैकी बहुतांश हे पोलिस निरीक्षक (PI) पदावरून पदोन्नती मिळवून प्रथमच उपअधीक्षक म्हणून गडचिरोलीत दाखल होत आहेत.
उपविभागांनुसार झालेले महत्त्वाचे फेरबदल आणि नवीन नियुक्त्या:
•घोट उपविभाग: उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांची अकोला येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आसीफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एटापल्ली उपविभाग: एसडीपीओ चैतन्य कदम यांची बारामती (पुणे) येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी संतोष बर्गे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कुरखेडा उपविभाग: एसडीपीओ रवींद्र भोसले यांची शिरूर (पुणे) येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी गिरीश गणपत बने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भामरागड उपविभाग: नक्षलविरोधी कारवायांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भामरागड उपविभागाचे एसडीपीओ अमर मोहिते यांची पुसद (यवतमाळ) येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी महेश चव्हाण हे पदभार स्वीकारणार आहेत.
अहेरी उपविभाग: एसडीपीओ अजयकोकाटे यांची नवी मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी हेमंत गणपत चांदेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेडरी उपविभाग: योगेश रांजनकर यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी शिवाजी गायकवाडहे जबाबदारी सांभाळतील. तर रिक्त पदाच्या जागी पराग सोनावणे यांची हेडरी उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
सिरोंचा उपविभाग: एसडीपीओ संदेश नाईक यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी परभणी येथून बदलून आलेले समाधान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बदल्या व रिक्त जागांची भरती:
•धानोरा उपविभाग: रिक्त पद भरण्याच्या निर्णयानुसार धनंजय जाधव यांची धानोरा उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
अहेरी मुख्यालय: सुनील उईके यांची अहेरी मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. तर अहेरी मुख्यालयातील अधिकारी विशाल नागरगोजे यांची शहापूर (ठाणे ग्रामीण) येथे बदली करण्यात आली आहे.
अमली पदार्थविरोधी पथक:शुभदा संख्ये यांची नागपूर-गडचिरोली अमली पदार्थविरोधी पथकात पोलिस उपअधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.
•इतर बदली: सूरज जगताप यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत गडचिरोलीत उपअधीक्षक पदावर थेट नियुक्ती झालेल्या तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची पद्धत होती. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणावर पदोन्नती मिळालेल्या पोलिस निरीक्षकांना येथे संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस विभागात या निर्णयाची विशेष चर्चा सुरू आहे. यासोबतच, नव्याने आलेल्या काही अधिकाऱ्यांची पूर्वीची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याची चर्चाही सध्या पोलिस वर्तुळात रंगू लागली आहे.

nagvidarbhavartae