Google search engine
Home आपला विदर्भ अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक: प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतदानाला उत्साहात सुरुवात; पहिल्या दोन...

अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक: प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतदानाला उत्साहात सुरुवात; पहिल्या दोन तासांत १८.७७ टक्के मतदान

 

 

अहेरी (विशेष प्रतिनिधी):-
अहेरी नगरपंचायत अंतर्गत अत्यंत चुरशीच्या ठरत असलेल्या प्रभाग क्रमांक ९ च्या जागेसाठी आज शनिवार, २० जून रोजी सकाळी मतदानाला शांततेत आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांचा कल पाहता मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत असून सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण १८.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

पुरुष मतदारांची आघाडी:
सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांत एकूण १२० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांनी आघाडी घेतली असून ६८ पुरुषांनी तर ५२ महिला मतदारांनी केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. सकाळच्या सत्रात मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या, ज्यात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज:
प्रभाग क्रमांक ९ मधील मतदानाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

nagvidarbhavartae