Google search engine
Home आपला विदर्भ अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक: प्रभाग क्रमांक ९ साठी आज मतदान; भाजप विरुद्ध राष्ट्रवादी...

अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक: प्रभाग क्रमांक ९ साठी आज मतदान; भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) थेट लढत

अहेरी (विशेष प्रतिनिधी):-
अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ च्या रिक्त जागेसाठी आज शनिवार दिनांक २० जून २०२६ रोजी पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक नागरिकांमध्ये या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

या पोटनिवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून प्रामुख्याने द्विरंगी लढत पाहायला मिळत आहे:
भारतीय जनता पार्टी (भाजपा) माया शंकर येलुरकर तर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) संजना हनुमंतु मडावी या दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचून जोरदार प्रचार केला असून, आता आज होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदान केंद्र आणि वेळ:-
प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली असून मतदारांसाठी खालीलप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे:
मतदान केंद्र:- जुनी ग्राम पंचायत भवन, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर मागे, अहेरी.
मतदानाची वेळ:- आज सकाळी ७:०० वाजल्यापासून ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

ही निवडणूक शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत गांगुर्डे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित सोनवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून, प्रभागातील सर्व मतदारांनी शांततेत आणि मोठ्या संख्येने बाहेर पडून आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

nagvidarbhavartae