
गडचिरोली:-
शासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि काँग्रेस नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना आज (१३ जून) चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात येत आहे. न्यायालयाने त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली होती. मात्र, आज न्यायालय या कोठडीत आणखी वाढ करणार की कंकडालवार यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय आणि राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.
•नेमके प्रकरण काय आहे?
काही दिवसांपूर्वी वॉकिंग करीत असताना अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर अत्यंत भीषण आणि प्राणघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
•आज न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष:-
यापूर्वी न्यायालयाने अजय कंकडालवार यांची चौकशी करण्यासाठी १३ जून पर्यंत पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली होती. आज या कोठडीची मुदत संपत असल्याने अहेरी पोलीस त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करत आहेत.
•अजय कंकडालवार यांच्या पोलीस कोठडीत (PCR) वाढ करण्याची मागणी करण्याची दाट शक्यता आहे.•
शासकीय वर्तुळातून दबाव अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. “जर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच असे जीवघेणे हल्ले होणार असतील, तर आम्ही सुरक्षित कसे?” असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध संघटनांचे पोलीस प्रशासनावर बारीक लक्ष आहे.
चामोर्शी न्यायालय आज पोलिसांचा युक्तिवाद आणि तपासाची डायरी तपासून PCR वाढवून देणार की कंकडालवार यांची रवानगी जेलमध्ये (न्यायालयीन कोठडीत) करणार? या निकालावर केवळ या प्रकरणाचा तपासच नाही, तर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची पुढील दिशा देखील अवलंबून आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष आता चामोर्शी न्यायालयाच्या इमारतीकडे लागले आहे.



