Google search engine
Home आपला विदर्भ ग्राम कोस समितीच्या ठरावासाठी आर्थिक प्रलोभनांचा आरोप; चौकशीची ग्रामस्थांची मागणी.!ओम साई राम...

ग्राम कोस समितीच्या ठरावासाठी आर्थिक प्रलोभनांचा आरोप; चौकशीची ग्रामस्थांची मागणी.!ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाखाली दलालांकडून हालचाली;तहसीलदारांना निवेदन.

तहसीलदारांना निवेदन देताना ग्रामस्थ

गडचिरोली/एटापल्ली:-तालुक्यातील जावेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध ग्राम कोस समित्यांचे ठराव बेकायदेशीररित्या मिळविण्यासाठी काही दलालांकडून आर्थिक प्रलोभने दाखविली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी तहसीलदार,एटापल्ली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाखाली काही व्यक्ती ग्राम कोस समितीच्या मोजक्या सदस्यांना हाताशी धरून ठराव मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.यासाठी आर्थिक लालच दाखविण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,ग्रामसभा व ग्राम कोस समितीची दिशाभूल करून काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक हितासाठी कार्यरत असल्याची शंका निर्माण झाली आहे.गावाच्या हिताशी संबंधित कोणताही निर्णय हा सर्व सदस्यांच्या उपस्थितीत,पारदर्शक व कायदेशीर प्रक्रियेनुसार होणे आवश्यक असताना काही व्यक्तींकडून नियमबाह्य पद्धतीने ठराव मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

याबाबत जावेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.तसेच ग्रामसभा व ग्राम कोस समितीच्या अधिकारांचे संरक्षण करून कोणताही बेकायदेशीर ठराव मंजूर होणार नाही,याची दक्षता घेण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे.

यावेळी सैनू लेकामी,नामदेव लेकामी,तनेश गोटा,नामसू हिचामी,बिरसा हेडो,मधुकर मट्टमी,रामसू नरोटे,प्रवीण लेकामी,रमेश हेडो,सचिन लेकामी,लालू पदा,झुरु तेलामी,मंगेश वड्डे,पेका लेकामी,अनिल काकडी,मंगू गोटा,लालू तेलामी,सत्तू झोरे,सत्तू तुमरेट्टी,सवजी झोरे,रावजी कोवसे,जीवन केरकेडा,वासूदेव हिचामी,भीमा पदा,मनोज गोटा,तोंदे तिम्मा,दिलीप लेकामी हे उपस्थित होते.!

nagvidarbhavartae