Google search engine
Home आपला विदर्भ निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या अचूकतेसाठी अहेरी येथे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ कार्यक्रम...

निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या अचूकतेसाठी अहेरी येथे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ कार्यक्रम सुरू

अहेरी:
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार संघातील मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि शुद्ध करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अहेरी येथील तहसील कार्यालयांतर्गत या मोहिमेला गती देण्यात आली असून, “माझा मत, माझा अधिकार – माझी जबाबदारी” या ब्रीदवाक्यासह नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
या मोहिमेच्या अंतर्गत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) थेट नागरिकांच्या घरी जाऊन भेटी देत आहेत. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि दुबार किंवा चुकीची नावे वगळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
तहसील कार्यालय, अहेरीकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, घरी येणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून मतदार यादीचे शुद्धीकरण योग्य प्रकारे होऊ शकेल.
“अचूक मतदार यादी हीच सुदृढ लोकशाहीची पायाभरणी आहे,” असे स्पष्ट करत प्रशासनाने सर्व नागरिकांना या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहकार्य करण्याचे व एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन केले आहे.

जनहितार्थ – नागविदर्भ वार्ता

nagvidarbhavartae