
वैभव पांढरे यांची प्रकृतीची विचारपूस करतांना आमदार धर्मरावबाबा आत्राम
गडचिरोली/अहेरी:-
नुकत्याच घडलेल्या एका गंभीर घटनेमध्ये गंभीररीत्या जखमी झालेले तरुण वैभव पांढरे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी जखमी वैभव पांढरे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
आमदार आत्राम यांनी वैभव पांढरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी थेट चर्चा केली. वैभव यांना वैद्यकीय उपचारात कोणतीही कमतरता भासू नये, अशा सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
“वैभव पांढरे यांच्यावर सर्वोत्तम उपचार केले जातील. या संकटकाळात आम्ही पांढरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.”
— आमदार धर्मरावबाबा आत्राम
या प्रसंगी आमदार आत्राम यांनी वैभव यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे खचून न जाण्याचा सल्ला देत, प्रशासन कायदेशीर कारवाई करतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.



